गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मुलीच्या लग्नासाठी करा हे उपाय

मुली लग्नाच्या वयात आल्या की आई-वडिलांना काळजी वाटणं साहजिक आहे. ते योग्य मुलाच्या शोधात असतात. पण कित्येकदा यश हाती लागत नाही. मात्र हे उपाय केल्याने यश मिळेल याची खात्री आहे.

* गुरुवारी लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात जाऊन विष्णूंना तुरा (लग्नाच्यावेळी लावली जाणारी टोपीच्या वर असलेला) चढवावा. याच्याबरोबर बेसनाचे पाच लाडूंचा नैवेद्य दाखवावा. याने लवकरच लग्न ठरेल. 
पुढे वाचा...
* मुलीने कोणत्याही गुरुवारी सकाळी अंघोळ करून पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून बेसनाचे लाडू तयार करावे. 108 लाडू बनवून त्याला पिवळ्या रंगाच्या टोपलीत पिवळ्या रंगाच्या कापडावर ठेवावे. श्रद्धेनुसार दक्षिणा ठेवावी आणि कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन लग्नासाठी गुरु ग्रहाची शांती व अनुकूलतेसाठी संकल्प करावा. यानंतर हे सगळं सामान एखाद्या ब्राह्मणाला दान करावे. महादेव आणि पार्वतीचे पूजन करावे.

विशेष: बेसनाचा चुरा किंवा एकही लाडू घरी ठेवू नये. हे सर्व कार्य अमृत, शुभ चौघडिया मुहूर्त पाहून, भद्रा मुक्त असताना करावे.
पुढे वाचा...
* शुभ मुहूर्तामध्ये खालील पैकी एका मंत्राचा जप करावा.

*  कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि।
नंदगोपसुतं देवं पतिं मे कुरु ते नमः।।


*  ॐ देवेंद्राणि नमस्तुभ्य देवेंद्रप्रिय भामिनी
विवाह भाग्यमारोग्यं शीघ्रलाभं च देहि मे।।