मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 26 मे 2014 (16:19 IST)

मोदी यांच्या शपथ सोहळ्यासाठी कोणती वेळ सर्वश्रेष्ठ

भाजपच्या विक्रमी यशानंतर नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख देखील निश्चित झाली आहे. राष्ट्रपती भवनातून निघाल्यानंतर मोदींनी मीडियाला सांगितले की 26 'मे'च्या सायंकाळी 6 वाजता शपथ समारंभ होणार आहे. 

ज्योतिष शास्त्राप्रमाणे तुला लग्नात समारंभाचा प्रारंभ होईल, पण शपथ घेण्याची उत्तम वेळ सायंकाळी 6.35 ते 6.45पर्यंत सर्वात श्रेष्ठ मुहूर्त आहे. या वेळेस दिल्लीत वृश्चिक लग्न सिंह नवांशमध्ये आहे.  

वृश्चिक लग्न स्वयं मोदींचे जन्म लग्न असल्यामुळे प्रभावशील राहील, तसेच वृश्चिक लग्न सिंह नवांशमध्ये असेल. वृश्चिक लग्न व सिंह नवांश दोघेही  स्थिर लग्न मानले जातात. या लग्नात जे काही कार्य केले जातील, स्थिर राहतात. जर ही वेळ शपथ घेण्याची असली तर स्थिर सरकार सोबतच एक दशकापर्यंत सरकार राहण्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

या लग्नाचा स्वामी मंगळ एकादश भावात असेल ज्याची चतुर्थ दृष्टी वाणी, धन, कुटुंब (येथे कुटुंब अर्थात भारताची जनतेशी लावण्यात आला आहे) भावात पडत आहे, जी अनुकूल आहे. 

मंगळाची दृष्टी पंचम भावात मित्र असल्यामुळे देशातील विद्यार्थी, चित्रपट-मनोरंजनाशी निगडित लोकांना लाभ मिळणार आहे. मंगळाची अष्टम दृष्टी षष्ट भावावर पडल्यामुळे शत्रू पक्ष प्रभावहीन होईल. 

शपथ लग्नाच्या वेळेस दशम भावाचा स्वामी सूर्य सप्तम भावातून लग्नाला बघत असल्यामुळे राज्य भाव देखील प्रबल होईल.  

शपथ लग्नच्या वेळेस मंगळाची राशी मेषवर स्वदृष्टिपण शत्रूवर भारी पडेल मग ती आं‍तरिक असो किंवा बाहेरील. गुरु उच्चाभिलाषी आहे, जो 19 जूनला उच्चाचा होणार आहे. देशासाठी येणारा काळ खरोखरच 'अच्छे दिन आने वाले आहे' असा असेल.