गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : बुधवार, 26 ऑगस्ट 2015 (16:33 IST)

रक्षाबंधनला केले जातात हे टोटके

रक्षाबंधन भाऊ बहिणीसाठी पवित्र सण असतो. काही लोकं या दिवशी विशेष पूजन करतात. तसेच या दिवशी आपले ग्रह दोष निवारण्यासाठी काही उपायदेखील केले जातात. जाणून घ्या असेच काही सोपे टोटके:
 
1. नजर दोष असल्यास तुरटीचा तुकडा ओवाळून जाळून द्यावा.

 

2. शत्रूला मात करण्यासाठी हनुमानाला चोला चढवून गुळाचा नैवेद्य दाखवावा. गुलाबाचे फूल चढवावे.


3. कोणी उधारी चुकता करत नसेल तर कापराने काजळ तयार करून एका कागदावर त्याने त्या व्यक्तीचे नाव लिहून मोठ्या दगडाखाली खणून द्यावे.


4. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी नीच किंवा शत्रू राशीत असेल किंवा अयोग्य स्थळी बसला असेल, त्याने काळा दगडाच्या स्क्वेअर तुकड्यावर खड्याने शनी यंत्र आखून स्वत:वरून 8 वेळा ओवाळून विहिरीत फेकून द्यावं. नंतर कधीच त्याचे पाणी पियू नये. 

काचेच्या बाटलीत मोहरीच तेल भरून त्याला काचेच्या झाकणाने बंद करावे. स्वत:वरून ओवाळून बाटली वाहत्या पाण्यात बुडवून द्यावी.


 
 


5. असं एखादं रोप जे वटवृक्षाच्या खाली उगून आलं असेल त्याला घरी आणून कुंड्यात वाढवावं, याने समृद्धी येते.


6. राहूची अंतर्दशा चांगली नसल्यास 11 नारळ स्वत:वरून ओवाळून वाहत्या पाण्यात सोडून द्यावे.


7. ज्यांना कालसर्प योग असेल, त्यांनी सर्प पूजन करावे आणि चांदीच्या डबीत मध भरून एकांत स्थळी खणून यावे.


8. चंद्र वाईट असल्यास दुधाने चंद्राला अर्घ्य देऊन तिथेच बसून 'ॐ सोमेश्वराय नम:' चा जप करावा. दूध दान द्यावं.

चित्र सौजन्य : रवीन्द्र सेठिया

9. जर घरात नेहमी काही अपघात होत असतील तर घरातील एखाद्या गुप्त स्थळी देवी महाकाली यंत्र स्थापित करा.


10. चंद्र आणि राहूच्या शांतीसाठी स्फटिक माळने देवी सरस्वतीचा मंत्र 'ॐ ऐं सरस्वत्यै नम:' चा जप करावा.


11. लग्न होत नसल्यास एखाद्या जुन्या लॉकने स्वत:ला ओवाळून रात्रीच्या वेळी चौरस्त्यावर फेकून या. मागे वळून पाहू नका. किल्ली स्वत: जवळ राहू द्या.




12. रोग बरा होत नसेल तर रात्रीच्या वेळी पत्रावळीवर शिरा वाढून रूग्णावरून 11 वेळा ओवाळून चौरस्त्यावर ठेवून द्यावी. किंवा रात्रभर एक नाणं रूग्णच्या डोक्याशी ठेवून सकाळी ते नाणं स्मशानात फेकून द्यावं.