शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

लकी नंबरच्या माध्यमाने करियरमध्ये यश मिळवा!

तुम्ही तुमच्या करीयरच्या बाबतीत चिंतेत असाल तर आता करीयर काऊंसेलरकडे जाण्याची गरज नाही, तुमच्या लकी नंबरनुसार तुम्ही करीयरची निवड करू शकता.

लकी नं. 1 : ज्यांचा लकी नं. 1 आहे ते न्यायव्यवस्था, प्रशासन, वैद्यकिय, इलेक्ट्रॉनिक, संशोधन या क्षेत्रात रस घेणारे असू शकतात. या कामात जास्त धावपळ करावी लागत नाही. या नंबरच्या लोकांसाठी बौद्धिक काम करायला आवडते.

लकी नं. 2 : या नंबरचे लोक सृजनशील असतात. लेखन, जल तथा वायूशी संबंधित काम, शिक्षणक्षेत्र, जाहिराती, चित्रपट या व्यवसायांशी त्यांचा संबंध येऊ शकतो.

लकी नं. 3 : ज्यांचा लकी क्रमांक 3 आहे, ती मंडळी समाजसेवा, राजकरारण, हॉटेल व्यवसाय, वनस्पती, शिक्षण, समीक्षण आदी किचकट व्यवसायांत उतरू शकतात.

लकी नं. 4 : या नंबरच्या लोकांना वेगवान कामात रस असतो. कामात धावपळ यांना आवडते. ही मंडळी लॉटरी, केमिकल, धातूशी संबंधित कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात.

लकी नं. 5 : या लकी क्रमांकाचे लोक व्यापार-व्यवसायात निपुण असतात. या लोकांसाठी कॉमर्स, बँकिंग, अकाउंटशी संबंधित कामे यांच्यासाठी शुभ आणि फायदेशीर ठरतात.

लकी नं. 6 : ज्या लोकांचा लकी नंबर 6 असतो ती मंडळी कला क्षेत्रात जास्त प्रगती करतात. सिनेमा, कला, फॅशन, टीव्ही शो, ग्लॅमर वर्ल्ड, पेंटिंग, सजावट, इत्यादी कामात ते निपुण असतात. या क्षेत्रात त्यांना यशही भरपूर मिळते.

लकी नं. 7 : ज्यांचा लकी नंबर 7 असतो ते लोकं सरळ मनाचे असतात. यांना नोकरीपेक्षा व्यापार जास्त फायदेशीर ठरतो. डॉक्टर, हॉटल किंवा खाण्या पिण्याचे काम, लक्झरी आयटम, कॉस्मेटिक्स व कपड्याचा व्यापार या लोकांसाठी उत्तम असतो.

लकी नं. 8 : ज्या लोकांचा लकी नंबर 8 असतो ते धावपळीची कामे चांगल्या प्रकारे करू शकतात. यांच्यात भरपूर प्रमाणात ऊर्जा असते. म्हणून हे लोक पोलिस, सैन्यदल, सिक्युरिटी, टुरिझम, वकिल बनू शकतात. स्टीलच्या व्यवसायातसुद्धा या लोकांना यश मिळू शकते.

लकी नं. 9 : या नंबरचे लोक बोलण्यात माहिर असल्यामुळे सेल्समन, नेता, सरकारी अधिकारी, पब्लिक रिलेशन ऑफिसर, रेडियो जॉकी बनू शकतात. किंवा आपल्या स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. या लोकांमध्ये नेतृत्वगुण असल्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करणे अवघड जाते.

कुठल्या ही करियरची निवड करण्या अगोदर फक्त आपली आवड नव्हे तर आपली योग्यता व लकी नंबराकडेसुद्धा लक्ष दिले तर तुम्ही नक्कीच सफल व्हाल.