मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

लग्नाअगोदर पत्रिका जुळवणी करण्याचे काय कारण?

हिंदू धर्मात जन्म पत्रिकेचा मुख्य रोल असतो. लग्न करण्याअगोदर जास्त करून लोकं जन्म‍पत्रिकेचे जुळवणी करवतात ज्यात ते वर आणि वधूच्या ग्रह-नक्षत्रांचे मिलान करतात आणि जाणून घेतात की त्या दोघांचे वैवाहिक जीवन कसे राहील. तसं तर बर्‍याच धर्म आणि जातींमध्ये कुंडली मिलान नाही केले जाते आणि लोक आपल्या पसंत आणि आवडीनुसार विवाह करतात.  
 
बर्‍याच वेळा मनात असे प्रश्न येतात की जन्मकुंडलीचे मिलान कशासाठी केले जाते आणि याचे मिलान करण्यामुळे खरंच काही फरक पडतो का? लग्नासाठी पत्रिका जुळवणीचे चार मुख्य कारण खाली देण्यात आले आहेत :
 
1. लग्न किती दिवस चालेल : हिंदू धर्मात पत्रिकेला सर्वात पहिले चरण मानण्यात आले आहे ज्यात भावी वर आणि वधूची जन्मपत्रिका बनवून त्याचे मिलन करून जाणून घेता येते की त्यांचे किती गुण जुळत आहे. त्याने त्यांच्या वैवाहिक जीवनाचा अंदाजा लावता येतो. 
 
शास्त्रानुसार, पुरूष आणि महिलेची प्रकृती, लग्नानंतर परिवर्तित होते जी आपसातील एक-दूसर्‍यांच्या व्यवहाराने जास्त प्रभावित होते. हेच कारण आहे की पत्रिकेचे मिलन करून हे जाणून घेतले जाते की लग्नानंतर त्या दोघांचे किती जमेल. 
2. नाते टिकून राहणे : पत्रिकेत गुण आणि दोष असतात ज्यांना लग्नाअगोदर मिळवले जाते, जर एखादे गंभीर दोष जसे - मंगळ इत्यादी निघाले तर संबंध पुढे न वाढवता तेथेच संपुष्टात आणले जाते. असे केले नाहीतर दोघांना भावी जीवनात त्रास होऊ शकतो. पत्रिकेत एकूण 36 गुण असतात ज्यातून किमान 18 गुण मिळाल्यावरच लग्न होणे शक्य आहे. यापेक्षा कमी गुण मिळाले तर पंडित लग्न करण्यास नकार देतात.  
 
गुण मॅचिंगचे निम्न क्षेत्र असतात : 
वर्ण- जातीचे मिलन करण्यासाठी   
वैश्‍य- आकर्षण 
तारा- अवधी 
योनी- स्वभाव आणि चरित्र 
ग्रह मैत्री- प्राकृतिक मैत्री  
गण- मानसिक क्षमता 
भकोत- दूसर्‍याला प्रभावित करण्याचे लक्षण   
नाडी- संतांनाच्या जन्माची संभावना   

3. मानसिक आणि शारीरिक दक्षता: भावी वर आणि वधूचा व्यवहार, प्रकृती, रुची आणि क्षमतेला जाणून आपसात पत्रिकेद्वारे मिलन करण्यात येते. जर दोघांच्या या गुणांमध्ये दोष आढळला तर लग्न होणे शक्य नाही. असे मानले जाते की जबरदस्तीने लग्न केल्याने दोघांचे संबंध जास्त दिवस टिकत नाही.  

 
4. वित्तीय स्थिती आणि परिवारासोबत संबंध कसे राहतील: पत्रिकेचे मिलन करून जाणून घेता येते की भावी दंपतीची वित्तीय स्थिती कशी राहील, त्यांचा परिवार कसा चालेल. त्यांना किती संतानं होतील. त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे संकट तर येणार नाही ना. ह्या सर्व गोष्टी आम्ही पत्रिका जुळवून जाणून घेऊ शकतो. मग आता तुमच्या घरी वर किंवा वधू लग्नाचे असतील तर त्यांची पत्रिका नक्की जुळवून घ्या, आणि नंतरच लग्न करा.