बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 एप्रिल 2014 (17:32 IST)

विवाहास ग्रहांचे बळ

मुलासाठी रविबल, वधुसाठी गुरूबल, व दोघांसाठी चंद्रबल असणे गरजेचे आहे.
 
रविचे बल – जन्मराशी पासून ०, ३, ६, १०, ११ या स्थानी रवि असता रविबल आहे, असे समजावे.
गुरूबल – जन्मराशी पासून २, ५, ७, ११ वा गुरू असल्यास, गुरूबल आहे असे समजावे. १, ३, ६, १० या स्थानी गुरू साधारण असतो. ४, ८, १२ 
 
असल्यास अनिष्ट समजावा. लग्नकार्य करायचे असेल तर गुरूची शांती जप करावा.
 
चंद्रबल – जन्मराशी पासून २, ५, ७, ११ या स्थानी गोचरीचा चंद्र असल्यास शुभ असतो. ४, ८, १२ स्थानी असल्यास अनिष्ट व बाकीचा साधारण.