मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

सिंह राशी व लाल पुस्तक

ND
ND
अक्षर तालिका- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे.
राशी विशेष- स्थिर मन, पराक्रमी, स्पष्टवक्ता, इमानदारी व न्यायप्रिय.

सिंह राशीचे (Leo) स्थान पोटात असते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. अग्नि तत्व प्रधान सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. भाग्य स्थिर असून सिंह लग्नाला बाधक राशी कुंभ आहे व बाधक ग्रह शनी आहे. मात्र लाल पुस्तकानुसार (किताब) शत्रु व मित्र ग्रहांचा निर्णय कुंडलीनुसारच घेतला जात असतो.

ND
ND
लाल पुस्तकानुसार सिंह राशीला पाचव्या घरातील राशी मानली जाते. सूर्य हे तिचे गृह आहे. सिंह राशीला पूर्व दिशेचे स्वामित्व प्राप्त झाले आहे. लाल पुस्तकानुसार आपल्याला सूर्याची स्थिती लक्षात घेता येत असते. तुमची राशी सिंह असेल तर खालील मुद्दे लक्षात घेणे लाभदायी ठरेल.

हृदयरोग, तोंडातून फेस येणे, अशक्तपणा येणे, उच्च रक्तदाब आदी आजार सूर्य संबंधित आहेत. सोने चोरीस जाणे, घरातील पिता किंवा मुलगा यांना मानसिक अथवा शारीरिक व्याधी जडणे, अशी लक्षणे जाणवतात.

सावधानी व उपाय-
मद्य व मांस सेवन करू नये. कोणाकडून फुकटाचे काहीच घेऊ नका. यात्रा करीत असताना थोड पदार्थ खावा. दररोज वडीलधारी मंडळींचा आशिर्वाद घ्यावा. अग्नि दूधाने विझवावी.