शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

गर्भवतींनो, धुम्रपान सोडा

धुम्रपान करणाऱ्या आणि गर्भवती असणाऱ्या महिलांसाठी धोक्याचा इशारा आहे. आपण धुम्रपान करत असाल तर आताच ते सोडून द्या. कारण त्यामुळे तुमच्याबरोबरच तुमच्या बाळालाही धोका उत्पन्न होऊ शकतो. 

अमेरिकेत प्रत्येत दहापैकी एकापेक्षा जास्त महिला धुम्रपानाच्या आहारी गेल्या आहेत. अशा अवस्थेत त्या गर्भार राहिल्यास धोका वाढतो. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात ही बाब पुढे आली आहे. या महिलांना संपूर्ण गर्भारपणात अतिशय ताणतणावांना सामोरे जावे लागते. त्यामुळे गर्भातील बाळाला त्याचा त्रास होऊन त्यात गंभीर आजार उत्पन्न होऊ शकतात. टेक्सॉस विद्यापीठातील डॉ. एम. डी. अंडरसन म्हणतात, की महिलांना हे सर्व माहित असते. पण सिगरेट सोडण्याची वेळ आली की त्या अळमटळम करतात. डॉक्टर गर्भारपणात सिगरेट सोडा असा सल्ला देऊनही महिला त्या पाळत नाहीत.

या काळात व्यसने सुरू ठेवल्याने वेळेपूर्वी प्रसूती होऊ शकते. शिवाय बाळामध्ये काही विकार उत्पन्न होण्याची शक्यता असते. अमेरिकेत पाचपैकी एका युवकाला सिगरेटचे व्यसन आहे. यात बारा टक्के गर्भार महिला आहेत.