गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

नियमित सेक्सने वीर्यात ताकद!

नुकतंच लग्न झालं असेल आणि मुलांचे 'प्लॅनिंग' करत असाल तर जरा या बातमीकडे नीट लक्ष द्या. प्लॅनिंग करतानाही नियमितपणे सेक्स मात्र करत जा. कारण नियमित सेक्स करण्यामुळे स्पर्म काऊंट आणि त्याची मजबूती वाढते, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे. 

ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी कमजोर वीर्य असणार्‍या ११८ रूग्णांच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला आहे. या सगळ्यांना नियमित सेक्स करायला लावण्यात आला. त्यामुळे त्यांच्या वीर्यातील कमजोर डिएनएंची संख्या कमी झाल्याचे लक्षात आले. सात दिवस नियमित सेक्स करणार्‍या या रूग्णांपैकी ८१ टक्के रूग्णांत वीर्यातील कमकुवतपणा बारा टक्क्यांनी कमी झाला होता. वीर्य मजबूत असेल तर गर्भधारणेची शक्यता वाढते.

टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान उर्फ इन व्हिट्रो फर्टिलायझेशनच्या ट्रिटमेंटपूर्वी सेक्स करू नये असा सल्ला देण्यात येतो. याचे कारण वीर्यवृद्धी (स्पर्म काऊंट) वाढावा हेच असते. वीर्य मजबूत होण्याची इतरही काही कारणे आहेत. धुम्रपान न करणे, दारू न पिणे, व्यायाम करणे यामुळेही वीर्याची ताकद वाढते.

या अभ्यासगटाचे प्रमुख डॉ. डेव्हिड ग्रीनिंग यांनी या अभ्यासाचे सार सांगताना, युवा जोडप्यांना नियमितपणे सेक्स करण्याचा सल्ला दिला. यामुळे मध्यमवयीन मंडळींना काळजी वाटू शकते, पण युवा जोडपी निश्चिततच आनंदतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नियमितपणे सेक्स केल्याने वीर्य मजबूत कसे होते? याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे, की वीर्य जास्त काळ शरीरात राहिल्याने कमकुवत होण्याची शक्यता असते. सेक्स केल्याने ते बाहेर पडते. अर्थात, विनापत्य जोडप्यांना हा उपाय अवलंबल्याने मूल होतेच, असे मात्र नाही, याकडेही काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.