गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

एड्सचा विळखा वाढतोय...

आज आंतरराष्ट्रीय एड्‍स निमुर्लन दिन साजरा केला जात आहे. भारत सरकारकडून एड्‍स संदर्भात मोठ्याप्रमाणात जनजागृती होत असली जागतिक आरोग्य संघटना व संयुक्त राष्ट्रकडून मिळालेला अहवाल धक्कादायक आहे. एड्‍सचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून जगात एड्‍स रुग्णांची संख्या तीन कोटी 34 लाखावर पोहचली आहे.  
 
देशाचे भविष्य समजले जाणारे तरूण मोठ्या संख्येने अडकले असून जगभरातील महिला, पुरुषासह मुलांना एड्‍सचा धोका वाढला आहे. एड्‍सचा पहिला रुग्ण 1981 मध्ये सापडला होता. आतापर्यंत एड्‍समुळे जगातील अडीच कोटी नागरिकांवर मृत्यू ओढावला गेला आहे. प्रती दिनी साडे सात हजार एड्‍सचे नवीन रूग्ण समोर येत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

एड्‍स कसा पसरतो, या संदर्भात भारतातील 80 ते 90 टक्के जनतेला माहिती आहे. मात्र त्यापासून बचावाची उपाय योजनेचे व्यवहारीक ज्ञान त्यांना नाही. एड्‍सच्या संक्रमनास 30 ते 35 टक्के युवापिढी जबाबदार असून भविष्यात त्याचे मोठ्या प्रमाणात संक्रमन होणार नाही यासंदर्भात युवानी अधिक सजग राहणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार भारतातील सहा राज्यात एचआयव्हीचा सगळ्यात जास्त पसार झाला आहे. त्यात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र नागालॅंड व मणिपूर या राज्यांचा समावेश आहे.

असुरक्षित यौन संबंध हाच एचआयव्ही संक्रमणामागील सगळग्यात मोठे कारण आहे. त्याच्या खालोखाल देह विक्री करणार्‍या महिला, समलिंगी संबंध, मादक द्रव्यांचे सेवन तसेच एचआव्ही बाधीत माताकडून होणार्‍या बालकाला यांचे प्रमाण आहे.

सर्वाधिक एड्स रुग्णाच्या संख्येच्या संदर्भात दक्षिण आफ्रिका व नायझेरिया या देशानंतर भारताचा क्रमांक लागतो अर्थात भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

एड्सचे संक्रमण कमी करण्यासाठी थायलंडमध्ये शास्त्रज्ञांनी एक लस तयार केली आहे. एड्सचे विषाणूंचे संक्रमण 30 टक्क्यांपर्यंत रोखू शकतात, असा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.