शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

सिगारेटहून जास्त खतरनाक आहे हे सुगंधित प्रोडक्ट..

वाढदिवस असो अथवा घरात एखादी पार्टी, आजकाल सुगंधित मेणबत्त्या लावून पाहुण्यांना खूश केले जाते. यामुळे घर तर छान दिसतेच पण सोबतच घरात सुगंधही दरवळतो. पण खूप कमी लोकांना याच्या दुष्परिणामाविषयी माहिती आहे. या सुगंधित मेणबत्त्यांमधून टॉक्सिक केमिकल बाहेर येते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. बहुतेक मेणबत्त्यांचा तर सिगारेट एवढा दुष्परिणाम असतो. म्हणजेच जर या मेणबत्तीचा सुगंध हवेद्वारे आपल्या शरीरात गेला तर सिगारेटनेही होणार नाही इतके घातक परिणाम होतात. 
 
अँलर्जीचे कारण
मेणबत्तीच्या पॅराफिन वॅक्समध्ये जवळपास 20 विषाक्त पदार्थ समाविष्ट असतात. त्यात सर्वात जास्त प्रमाण टॉक्सिक एसीटोन, फिनोल, जाइलिन, क्रेसोल आणि ब्लॉरोबेंझीन यांचे असते. यामुळे कॅन्सरचा धोका असतो. 
 
हे पण वाचा - सकाळी ही कामे कधीच करू नका, नाहीतर..
 
श्वासाची समस्या आणि अस्थमा 
मेणबत्तीच्या वापराने पॅराफिन वॅक्स आणि अस्थमा वाढतो. मेणबत्तीत असलेले सिंथेटीकने श्वास घेण्यास त्रास होतो. मेणबत्ती जळाल्यानंतर त्यातून एक वेगळाच वास येतो. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ आणि श्वासाच्या तक्रारी वाढतात. 
 
डोकेदुखी 
सुगंधित मेणबत्तीच्या वापराने डोकेदुखीही होऊ शकते. 
 
टय़ुमर आणि कॅन्सरचा धोका
मेणबत्ती वितळल्यावर त्याच्या मेणाच्या वासाने टय़ुमर होण्याचा धोका असतो. डिझेलसारखा वास येणारे (बेंझिन आणि टोल्यूनी) हे घटक हवेत मिसळल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.