testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अजब-गजब: आईच्या गर्भात चेहरा ओळखण्याची कला शिकतो भ्रूण

Embryo
जगात येण्याअगोदरच आईच्या गर्भात शिशूत बर्‍याच प्रमाणात समज विकसित होऊ लागते. याचे ताजे उदाहरण आहे हे
अध्ययन, ज्यात विशेषज्ञांनी बघितले की गर्भस्थ शिशू चेहरा ओळखण्याची कला शिकू लागतो. लँकास्टर युनिव्हर्सिटीच्या
शोधकर्तांनी 4डी स्कॅनच्या मदतीने हे अध्ययन केले आहे.

विशेषज्ञांनी गर्भात वाढत असलेल्या शिशूचे प्रकाशावर केलेल्या प्रतिक्रियेच्या आधारावर हे निष्कर्ष काढले आहे. त्यांनी बघितले की गर्भातून येत असलेल्या प्रकाशात चेहर्‍याची आकृती बनल्यानंतर शिशूची भाव-भंगिमा वेगळ्या प्रकाराची होती. चेहर्‍याची आकृती न बनल्यास त्याने कुठल्याही प्रकाराची प्रतिक्रिया दिली नाही. प्रमुख शोधकर्ता प्रोफेसर विंसेंट रीडचे म्हणणे आहे की या अध्ययनामुळे भ्रूणच्या दृष्टी विकासाचा क्रम समजण्यास सोपे जाईल.

शोध दरम्यान विशेषज्ञांनी प्रकाशाच्या मदतीने 34 आठवडे भ्रूणाला आईच्या गर्भात बिंदूंच्या मदतीने डोळे किंवा चेहर्‍याची आकृती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बघितले की आकृती बनल्यानंतर भ्रूण ने डोकं हालवलं आणि त्या आकृतीवर गौर केले.

इतर कुठल्या ही आकृतीवर शिशूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा शोध करंट बायोलॉजी पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.
प्रोफेसर रीड यांचे म्हणणे आहे की भ्रूणच्या मेंदूचा विकास चेहरा ओळखण्याच्या दिेशेवर होतो. म्हणून तो दुसर्‍या आकृतींवर कुठलीही प्रतिक्रिया देत नाही.


यावर अधिक वाचा :

पाकिस्ताकडून गोळीबार, एक जवान शहीद

national news
ईदच्या दिवशीही जम्मू-कश्मीरमधील वातावरण तणावाचे आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ...

निर्लेपला बजाज इलेक्ट्रिकल्स विकत घेणार

national news
निर्लेप कंपनी आता बजाज इलेक्ट्रिकल्स विकत घेणार आहे. विशेष म्हणजे यंदा या कंपनीला ५० ...

पंतप्रधान कार्यालयातून अण्णा हजारेंसाठी आला संदेश

national news
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विषयांवर पत्र ...

रोनाल्डोने मारली ५१ वी हॅट्ट्रिक, सामना बरोबरीत सुटला

national news
फुटबॉल वर्ल्डमध्ये चुरशीच्या लढतीत पोर्तुगाल आणि स्पेन हा सामना बरोबरीत सुटला. निर्णायक ...

बलात्कारी बापाने बायकोला कोर्टात ठार मारले

national news
आसाममधल्या दिब्रूगड कोर्टात लहान मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या ...