Widgets Magazine

चाळीशी आली बदाम खा!

चाळीशी आली की शरीराकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे भागच पडते. त्यादृष्टीने आपल्या खाण्यापिण्याकडे आधी लक्ष देणे चांगले. संशोधकांनी म्हटले आहे की, चाळीशीत बदाम व अन्य काही पदार्थ खाणे हृदयासाठी चांगले ठरू शकते.

दूध, बादाम, टोमॅटो, चेरी, मासे आदी पदार्थांमुळे हृदयाचे आरोग्य चांगेल राहू शकते. असा आहार कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी मदत करतो. चाळीशी गाठलेल्या आणि विशेषत: हृदयविकार असलेल्या लोकांना असा आहार घ्यावा. रोज वीस मिनिटांच्या व्यायामानंतर 150 मिली लीटर टोमॅटोचा रस पिला तर पोटाचा कर्करोग होत नाही. तसेच हा रस हृदयविकारालाही दूर ठेवतो. शाळा-महाविद्यालयातील मुलांचा आहारही महत्त्वाचा असतो. अशा मुलांनीही बदाम खाणे उपयुक्त ठरते.


यावर अधिक वाचा :