शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

अधिक वेळा दूध उकळवत असाल तर सावध व्हा

आपण हे ऐकले असेल की दुधाला उकळून प्यायला हवं, ज्याने त्यातील सूक्ष्म जिवाणू नष्ट होऊन जातात. दूध उकळून पिणे योग्य आहे पण दूध वारंवार उकळून पिणे हानिकारक होऊ शकतं.
हो हे खरं आहे, दुधाने पोषण प्राप्त करण्यासाठी आपण दूध उकळून पित असला तरी एका शोधात हे स्पष्ट झाले आहे की वारंवार दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होऊन जातात. असे केल्याने आपल्याला दुधाचे ते पोषक तत्त्व प्राप्त होणे शक्य नाही ज्यासाठी आपण दुधाचे सेवन करता.
 
पोषणच्या या नुकसानापासून वाचण्यासाठी, दूध वारंवार उकळू नये. दूध उकळताना ते 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळेपर्यंत उकळू नये. आचेवर दूध असताना चमच्याने हालवत राहा.
 
रिसर्चप्रमाणे, 17 टक्के स्त्रियांना हे माहीत नसतं की वारंवार दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होतात. तसेच 59 टक्के स्त्रियांना वाटतं की दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्वांची वृद्धी होते आणि 24 टक्के स्त्रियांना वाटतं की दूध उकळल्याने काही फरक पडत नसतो.
 
तर आता दूध केवळ एकदा उकळावे आणि आपल्या मुलांना पूर्ण पोषण प्राप्त करू द्यावे. आपलं समजूतदारपणा मुलांच्या जीवनासाठी फायदेशीर सिद्ध होईल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने याचे चांगले परिणाम प्राप्त होतील.