गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (12:48 IST)

30 पार असणार्‍या पुरुषांनी जरूर कराव्या ह्या 10 Test, जाणून घ्या?

हार्ट डिजीज, हाय BP, डायबिटीज सारखे आजार आधी वाढत्या वयात होत होते, पण आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस आणि अनहेल्दी डाइटमुळे आता 30 वर्षांनंतर बर्‍याच लोकांना या सीरियस हेल्थ प्रॉब्लमला तोंड द्यावे लागत आहे. तुम्ही हेल्दी आहे की नाही हे कसे जाणून घ्याल ?  
 
डॉक्टर्स 30 वर्षांनंतर रेग्युलर हेल्थ टेस्ट करण्याचा सल्ला देतात, ज्याने कुठलीही हेल्थ प्रॉब्लम असेल तर ती सुरुवातीतच माहीत पडू शकते.  
 
थायरायड
जर बीना कारण थकवा, मसल्स पेन, ताप, भूक न लागण्याची प्रॉब्लम असेल तर थायरॉयडची चाचणी करण्यासाठी T3, T4, THS  टेस्ट करवून घ्या. तुमच्या कुटुंबात कुणाला थायरॉयड असेल, तेव्हा देखील वर्षातून एकदा ही टेस्ट नक्की करावी. 
 
ब्लड प्रेशर 
30 वर्षाच्या वयानंतर बर्‍याच लोकांना BPची प्रॉब्लम होते, म्हणून महिन्यातून एकवेळा BP चेक करवणे फारच गरजेचे आहे. हाय BP मुळे किडनीची समस्या, हार्ट डिसीज आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. 
 
शुगर
30 पार झाले आहात, तर वर्षातून एकवेळा फास्टिंग आणि रॅंडम ब्लड शुगर लेवल चेक करणे गरजेचे आहे. वाढलेली शुगर डायबिटीजचे कारण बनू शकते. 
 
ईसीजी
तुम्हाला नेहमी थकवा आल्यासारखा जाणवतो. पायर्‍या चढताना दम लागतो, तर ECG  टेस्ट करायला पाहिजे. फॅमिलीमध्ये कुणाला हार्ट प्रॉब्लम असेल, तरी देखील वर्षातून एकदा ईसीजी टेस्ट करवून घ्यावी. 
 
कोलेस्टरॉल
बॉडीचे हाय कोलेस्टरॉल हार्ट डिसीजसाठी धोका वाढवतो. म्हणून वर्षातून एकदा बॉडीचे कोलेस्टरॉल लेवल जरूर चेक करवायला पाहिजे. 
 
ब्लड पिक्चर 
तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो. थोडे काम केल्याने किंवा थोडेही चालले फिरले तर तुम्ही थकून जाता, तर ब्लड पिक्चर टेस्ट करवून घ्या. याने माहीत पडेल की बॉडीमध्ये हिमोग्लोबिन लेवल योग्य आहे की नाही.  
 
लिपिड प्रोफाइल
या टेस्टमुळे कोलेस्टरॉल आणि ट्रायगिस्लराइडचे लेवल माहीत पडते. लिपिड प्रोफाइल जास्त असल्याने किडनी आणि हार्ट डिसीजचा धोका वाढू शकतो. वर्षातून एकवेळा ही टेस्ट नक्की करावी. 
 
लिवर प्रोफाइल 
लिवर योग्य प्रकारे काम करत आहे की नाही, तुम्हाला लिवर रिलेटेड धोका तर नाही ना, याची माहिती लिवर प्रोफाइल टेस्टच्या माध्यमाने जाणू शकता. वर्षातून एकवेळा ही टेस्ट करवायला पाहिजे. 
 
रीनल प्रोफाइल 
या टेस्टमुळे हे माहीत पडते की किडनी योग्य प्रकारे काम करत आहे की नाही. वर्षातून एकदा रीनल प्रोफाइल टेस्ट नक्की करवून घ्यायला पाहिजे, ज्याने किडनी डिसीजचा धोका माहीत पडू शकतो. 
 
अल्ट्रा सोनोग्राफी
या टेस्टमुळे फॅटी लिवर स्टोन, अल्सर किंवा पोटाशी निगडित इतर समस्यांची माहिती मिळू शकते. वर्षातून एकदा अल्ट्रा सोनोग्राफी करवू शकता.