Widgets Magazine

अपुर्‍या झोपेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा

आपल्या मुलांची झोप अपुरी होत असल्यास पालकांनी सावधानता बाळगली पाहिजे, कारण पुरेशी झोप न झाल्याने या मुलांचे वजन वाढण्याची व ते लठ्ठ होण्याची शक्यता अधिक असते. रायटर या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुरेशी झोप मिळत नसलेले मुले लठ्ठ होतात, त्यांचे वजनही प्रमाणापेक्षा अधिक वाढते, असा निष्कर्ष डेन्मार्क येथील संशोधकांनी काढला आहे.
दोन ते सहा वर्ष वयोगटातील 368 मुलांच्या अभ्यासवरून हा निष्कर्ष काढला आहे. नवीन अभ्यासानुसार लहान मुलांमध्ये पुरेशा झोपेच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतात, यावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे.


यावर अधिक वाचा :