शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

Red Wine फक्त पुरुषांसाठीच...

आरोग्यप्रकृत चांगली राहावी म्हणून अनेकजण आवर्जून रेड वाईनचे पेग रिचवताना दिसतात. रेड वाईनने पुरुषांच्या आरोग्यात सुधारणा होत असली तरीसुद्धा महिलांच्या दृष्टीने ती फारशी लाभदायी नसल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. वाईनमध्ये आढळणारा रिझव्हेट्रॉल हा घटक हृदयविकाराच्या आजारापासून व्यक्तीचा बचाव करतो. त्याच्यामुळेच व्यक्तीच्या जीवनकांक्षेतदेखील वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. याच घटकामुळे व्यक्तीचा उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या आजारांपासून बचाव होतो, असेही सांगितले जाते. 

लाल रंगाचे द्राक्ष आणि त्यापासून तयार केल्या जाणार्‍या रेड वाईनमध्ये हा घटक मुबलक प्रमाणावर असतो. या घटकाचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी संशोधकांनी त्याची विशिष्ट मात्रा विविध वयोगटातील महिलांना देऊ केली होती, पण या घटकाचा त्यांच्यावर विशेष परिणाम होत नसल्याचे दिसून आले.

वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. 'सेट मेटाबोलिझम' या नियतकालिकात या संशोधनातील निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दरम्यान, शरीरातील आरोग्यदायी घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी रिझव्हेट्रॉलच्या गोळ्या घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.