शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

झोपेच्या गोळ्या घेणं कितपत सु‍रक्षित

निद्रानाश ही आताच्या काळाची गंभीर समस्या आहे. अनेक लोकं यापासून मुक्ती मिळवण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेयला सुरू करतात. कारण गोळ्या घेतल्यावर बेसुध झोप येते आणि उठल्यावर रिलॅक्स वाटतं. परंतू या गोळ्यांच्या आहारी जाणे कितपत योग्य आहे? या गोळ्यांने ताणापासून मुक्ती तर मिळते पण याचा आरोग्यावर काय प्रभाव पडतो हे माहीत आहेत का?
अधून- मधून झोपेच्या गोळ्या घेणं लाभदायक असलं तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेणं टाळावे. या गोळ्यांने झोपे संबंधी समस्या दूर होतात कारण या नर्व्ह सिस्टमला रिलॅक्स करतं, विशेषतः: त्या टॅबलेट्स ज्यात बेंजोडायजेपाइन आढळतं.
 
याव्यतिरिक्त ज्या गोळ्यांमध्ये नॉनबेंजोडिजेपाइन आढळतं त्याचे साइड इफेक्ट प्रोफाइल सेफ असतं, असे अलीकडील शोधात स्पष्ट झाले आहे. तसेच काही परिस्थितीत औषधांचा प्रभाव, लिव्हर आणि किडनीवर पडतो. म्हणून आपण मनाने या गोळ्या घेयला नको.
 
डॉक्टर जे औषध लिहून देतात त्याने आपण रिलॅक्स होता आणि साइड इफेक्ट्सपासून वाचता. हे औषध सुरू करताना डॉक्टरांना हेही विचारणे गरजेचे आहे की आपल्याला या गोळ्या किती दिवस आणि किती मात्रेत घ्याच्या आहे.
 
झोपेसाठी टॅबलेटव्यतिरिक्त ओरल स्प्रे किंवा विरघळणार्‍या गोळ्याही येतात.
 
डॉक्टर असे औषध एका क्रमाप्रमाणे देतात ज्याने आपल्याला याची सवय लागायला नको आणि आपल्या शरीरावर याचे दुष्परिणाम व्हायला नको. परंतू हे टॅबलेट घेण्याव्यतिरिक्त स्वत:ला फीट ठेवण्यासाठी वर्कआउट केले पाहिजे. कॅफीनचे सेवन कमी करण्यासाठी कॉफी आणि चहा कमी प्यायला पाहिजे.