शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

आता सोयाबिनने बनतील शाकाहारी अंडे

काही लोकांची शाकाहारीची वेगळीच व्याख्या असते. त्यांना याबाबत विचारले जाते, तेव्हा ते आपण पूर्ण शाकाहारी आहोत, फक्त अंडी खातो, असे चक्रावून टाकणारे उत्तर देतात व अंडे मांसाहार नाही, असे स्पष्टीकरण वरून देतात. मात्र आता कुणी असे सांगितले तर त्यावर शंका न घेता विश्वास ठेवा. कारण आता असे अंडे तयार झाले आहे, जे रोपड्यांपासून बनविण्यात आले आहे. 
 
ते दिसायला एकदम कोंबडीच्या अंड्यासारखेच आहे. रोपट्यांपासून बनलेल्या अंड्यामध्येही तुम्हाला असली अंड्याप्रमाणेच पिवळा बलक, पांढरा गर सगळे काही मिळेल. हे अंडे तयार करण्यासाठी वनस्पती तेल आणि जेलसारख्या पदार्थांचा वापर केला आहे, मात्र त्यात असली अंड्यात आढळणार्‍या कोलेस्ट्रोलसारखे काहीही नाही.
 
हे शाकाहारी अंडे बनविण्यासाठी ज्या रोपट्याचा वापर करण्यात आला आहे, ते सोयाबिनचे आहे. उडीन विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांनी हे अंडे तयार केले आहे.