शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

Watermelon : कलिंगड खाल्ल्यामुळे रक्तदाब निंत्रणात राहत

उन्हाळच्या काळात कलिंगडामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतो. याच कलिंगडाच्या सेवनामुळे लठ्ठ व्यक्तिंचा रक्तदाब नियंत्रणात राहत असल्याचे नवीन संशोधन उघड झाले आहे.

निमित्त कलिंगड खाल्ल्याने हृदयावरील ताण आणि रक्तदाब कमी होतो, असे फ्लोरिडा विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर आर्टुरो फिग्युरो  यांनी सांगितले.

थंड वातावरणात अनेकांचा मृत्यू हा हृदविकाराच्या झटक्याने होत असतो. कारण थंड वातावरणाचा मोठा परिणाम होऊन उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे रक्ताभिसरण करण्याची हृदयाची क्षमता कमी होते. त्यामुळे हृदयाकडे रक्ताचा पुरवठा कमी होतो. तसेच लठ्ठ व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तिंना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते, असे संशोधकांनी सांगितले.

लठ्ठ व मध्यमवयीन व्यक्तींचा संशोधकांनी 12 आठवडे अभ्यास केला. या व्यक्तिचे दोन गट पाडण्यात आले. त्यावेळी लठ्ठ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे दिसून आले. थंड वातावरणात थंड पाण्यात काही व्यक्तिंना हात घालून राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब      तपासला. पहिल्या सहा आठवडय़ात पहिल्या गटातील व्यक्तिंच्या अमिनो अँसिडची पातळी चार ग्रॅमने वाढल्याचे आढळले. या व्यकितंनी जीवनशैली व आहाराबाबत बदल केल्यास त्यांना थोडा दिलासा आढळला. तसेच या व्यक्तिंनी कलिंगड खाल्यानंतर त्यांचा रक्तदाब सुधारला आणि हृदयाशी संबंधित हालचालीत सुधारणा झाली.

तसेच ज्या व्यक्तिंना तणावाचा सामना करावा लागत होता. त्यांना तात्पुरती विश्रंती देण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे हृदयाच्या हालचाली व्यवस्थित सुरू झाल्या. हा अभ्यास अमेरिकन जर्नलच हायपरटेन्शनमध्ये प्रसिध्द झाला आहे.