गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

आता केवळ दोन रुपयात मधुमेहाची चाचणी!

WD
रक्तातील शर्करेचा स्तर तापासून घेण्यासाठीची चाचणी आता आणखी सोपी व स्वस्त झाली आहे. केवळ एकच मिनिटात अशी चाचणी होऊ शकेल व त्यासाठी दोन रुपयांपेक्षाही कमी खर्च होईल. ग्लुकोज मीटरच्या तुलनेत एक हजारपट कमी रक्ताने ही चाचणी करता येऊ शकेल हे विशेष. भारतात 610 लाख लोक मुधमेहाने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकांना वारंवार आपल्या रक्तातील शर्करेचे प्रमाण तपासून पाहावे लागते. अशा लोकांना आता हे उपकरण एक वरदान ठरू शकते.

बीआयटीएस पिलानीच्या संशोधकांनी तयार केलेल्या या उपकरणाला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सर्व चाचण्यांमध्ये मान्यता मिळाली आहे. ते बाजारात येण्यापूर्वी त्याच्या आणखीही काही चाचण्या होतील. आरोग्य मंत्रालय दीर्घकाळापासून पाच रुपयांमध्ये चाचणी करणारे डायबिटिक टेस्टिंग चीप तयार करण्याचे आश्वासन देत आले आहे. मात्र , हे ग्लुकोमीटर त्यापेक्षाही स्वस्तात चाचणी करील. या डायग्नॉस्टिक उपकणाचे मुख्य डेव्हलपर सुमन कपूर यांनी सांगितले की, चाचणी करणे व तिचा निष्कर्ष मिळणे यात दहा सेकंदांपेक्षाही कमी वेळ लागेल.