शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 16 ऑक्टोबर 2014 (14:53 IST)

आता घ्या झोपेत निर्णय!

आपण झोपेतही निर्णय घेऊ शकतो.. ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना, पण हे खरंय आणि मानसशास्त्रज्ञांनी ते सिध्द करून दाखवलं आहे. आपला मेंदू झोपेतही जागृतावस्थेत असतो व त्याचा जणू एक डोळा उघडा असतो. त्यामुळे महत्त्वाच्या मीहितीचं विघटन व विश्लेषण करण्याचं त्याचं काम सुरूच असतं. फ्रान्समधील इकोल नॉर्मल सुपिरिएर द पारी या संस्थेतील सिद कौदेर व थॉमस आंद्रिलॉन या दोन संशोधकांनी हा निष्कर्ष मांडला आहे. मेंदू झोपेतही मीहितीचं विश्लेषण करत असल्याने झोपेतून उठल्यावर अगदी तत्काळही आपल्याला निर्णय घेणं सोपं जातं आणि म्हणूनच झोपेतून उठल्यावरदेखील आपण बाहेरील वातावरणाशी परिचित असतो. कधी कधी असं म्हटलं जातं की अमुक माणसाला एखाद्या विषयाची इतकी अचूक माहिती आहे की अगदी झोपेतही तो त्यांच उत्तर देईल. असं म्हणणमीगे आपला मेंदू निद्रावस्थेतही विश्लेषण करतो हेच नेमकं कारण यासाठी आहे. एखादा मनुष्य गाडी चालवण्यात सराईत असतो त्याप्रमाणे आपला मेंदू देखील झोप घेत असतानाही निर्णय घेण्यास सरावलेला असतो. अर्थात मेंदूच्या बाकी क्षेत्रामधले काम यावेळी बंद असतं. पण झोपायच्या अगदी काही क्षण आधी मेंदूला काही काम सोपवलं तर मेंदू निद्रावस्थेत त्याचा विचार करून ठेवतो. सिद कौदेर व थॉमस आंद्रिलॉन या दोन संशोधकांनी यासंबंधी एक प्रयोग केला. त्यात सहभागींना काही शब्द ऐकवण्यात आले व त्या शब्दांनुसार त्यांना एक बटण दाबायला सांगण्यात आलं. या प्रयोगात सहभागी झोपी गेल्यानंतरही त्यांना शब्द ऐकवणं सुरू ठेवण्यात आलं व त्यांच्या मेंदूनेही त्यांचं विश्लेषण करणं सुरू ठेवल्याचं आढळलं. भविष्यात माणसाने जर झोपेतही काही नवीन शिकण्याचं ठरवलं तर मेंदूच्या या क्षमतेचा निश्चितच उपोग होऊ शकतो.