शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2015 (16:29 IST)

आरोग्यविषयक हेल्थीफाय मी अँप लाँच

भारतात मधुमेहासह अनेक आजार मोठय़ा प्रमाणावर नागरिकांना आपल्या विळख्यात घेत आहेत. त्यामुळे आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी झी एंटरटेंन्मेंटने ‘हेल्थीफाय मी’ या अँप्सचे लाँचिंग करण्यात आले आहे. ‘हेल्थीफाय मी’चे सीईओ तुषार वशिष्ठ आणि बिझनेस हेड डॉ. रेश्मा नायक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या अँपच्या माध्यमातून जेवण मिळावे तसेच व्यायामाची सवय लावण्यास मदत होणार आहे. 20 कोटी लोक मधुमेहासारखे आजार. कोणी हेल्थी होण्याचा प्रयत्न केला तर 300 रूपयांचे प्रोडक्ट देणार, हे अँप्स 100 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असून ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरवेळेस 20-30 टक्के ग्रोथ होतोय. डेटा रेव्ह्यूलेशन होत आहे. अनेकाकडे स्मार्टफोन असल्यामुळे अँप जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचेल. जेवण ट्रँक केलं जातं. जेवणाच्या थालीचे फोटो काढले तरी, जेवणातील कंटेट दिलं जातं. अँपच्या माध्यमातून न्यूट्रिशियनिस्ट आणि ट्रेनर चांगले प्रशिक्षण देणार आहेत. हे इतर कोणत्या अँपमध्ये नाही. 10 लाख लोकांना आरोग्यदायी करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत, अशी माहिती डॉ. रेश्मा नायक यांनी सांगितली.