शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

ऊन खा! खूश राहा!

साठ ते सत्तर वर्षांपूर्वी शीत कटिबंधात राहणार्‍या लोकांना मुडदूस (रिकेट्‍स) नावाचा रोग व्हायचा. मुडदूस म्हणजे हाडं ठिळूळ होणं, दात वेडेवाकडे असणं, वाढ नीट न होणं, दात उशिरा येणं, हाता-पायांची हाडं वाकडी होणं, आतल्या बाजूला वाकणं, त्वचा निस्तेच होणं, फासळयांवर गांठी येणं हे सर्व आजार लहान मुलांमध्ये विशेषत्वाने आढळून यायचे. शास्त्रज्ञांनी 20 वर्षापूर्वी असं भविष्य वर्तवलं होतं की, भारतासारख्या सूर्यप्रकाश भरपूर मिळणार्‍या देशात मुडदूस हा आजार होत नाही. कारण भारत उण्ष कटिबंधातीलदेश आहे. पण सध्या भारतात खाकरून मुंबईत हाडं, त्वचेच्या आजाराचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलंय. हे आजार 'ड' जीवनसत्त्वाच्या आभावामुळे होतात, हा मुद्दा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आहारतज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात अधोरेखित झालाय. 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वाच्या अभावापेक्षा 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता देशात जास्त असल्याचं या सर्वेक्षणात आढळून आलंय. सूर्यप्रकाश हा 'ड' जीवनसत्त्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. आठवड्यातून सकाळी दहा पूर्वी तीन चे चार वेळा सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसावं. सूर्यप्रकाशाच्या व्यतिरिक्त साल्मन मासे, सारडीन्स मासे, शेळीचं दूध, शायटेक अळंबी, अंडी यांमध्ये 'ड' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असतं. कार्ड ल्विहर ऑईलही 'ड' जीवनसत्त्वाचा पूरक स्त्रोत आहे.