शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

का वाढते जाडी?

वाढत्या जाडीला अनेक घटक कारणीभूत ठरतात. पण आपण केवळ आहारावर संक्रांत आणतो. जाडी वाढायला लागली की रात्रीचं जेवण बंद करणं, आहारातून तेल, तूप वर्ज्य करणं, सोसेल इतका व्यायाम करणं आदी मार्ग अवलंबले जातात. पण खरं पाहता जाडी अन्य कारणामुळेच वाढत असते. तज्ज्ञांच्या मते जाडी वाढण्याची सहा प्रमुख कारणं आहेत. तुम्हीही या समस्येशी झगडत असाल तर ही कारणं पडताळून पाहा.


 
अँटी डिप्रेशन 
अँटी डिप्रेशन गोळ्या घेत असणार्‍यांचं वजन वाढतं. हा नकारात्मक प्रभाव आहे. म्हणूनच वजन नियंत्रित करण्यासाठी अँटी डिप्रेशन गोळ्या न घेता अन्य थेरपी अवलंबावी.
 
गर्भनिरोधक
गर्भनिरोधक गोळ्या वापरणार्‍या स्त्रियांना वाढत्या जाडीचा सामना करावा लागतो. म्हणूनच याचा वापर थांबवून अन्य मार्ग अनुसरावा.

झोपेच्या गोळ्या
निद्रानाशाची समस्या असणारे झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र याचा परिणाम जाडी वाढण्यामध्ये होतो. नियमित स्वरूपात या गोळ्या सेवन केल्या तर जाडी हमखास वाढते.


 
अर्धशिशीवरील औषधोपचार
अर्धशिशीची समस्या असणार्‍या व्यक्तींना दररोज हेवी डोस घ्यावा लागतो. तरच त्या काम करू शकतात. पण जाडीवर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. मुख्य म्हणजे याचे अन्य काही गंभीर दुष्परिणामही भोगावे लागतात.

स्टेरॉइड
स्टेरॉइडमधील गुणतत्त्वांमुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. मात्र कमी असेल आणि कमी अवधीसाठी स्टेरॉइड घेतलं जात असेल तर ही समस्या उद्भवत नाही. मात्र दीर्घकाळ स्टेरॉइह घेत राहिल्यास जाडी वाढण्याचा धोका संभवतो.


 
इन्शुलिन
मधुमेहींना रक्तातील शर्करेचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी काही वेळा इन्शुलिन घ्यावं लागतं. पण यामुळे वजन वाढण्याचा धोका संभवतो. म्हणूनच इन्शुलिन घ्यावं लागणार्‍यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं उचित आहार आणि नियमित व्यायाम करायलाच हवा.