गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (11:46 IST)

केवळ 25 मिनिटे फिरून आयुष्य सात वर्षानी वाढवा

दररोज 25 मिनिटं वॉकिंग केल्याने तुमच्या आयुष्यात सात वर्षे वाढू शकतात असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच थोडासा व्यायाम करून तुम्ही हार्ट अटॅकची शक्यता कमी करू शकतात. 
 
युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीमध्ये सादर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार रोज व्यायाम केल्याने तुमचे वय वाढते. जर्मनीच्या सारलँड विद्यापीठात 30 ते 60 वयोगटातील 69 व्यक्तींवर संशोधन करण्यात आले. जे दररोज व्यायाम करत नव्हते. वृध्दावस्था आपण रोखू शकत नाही. पण रोज व्यायाम केल्याने वय वाढण्याची प्रक्रिया कमी होते.
 
अशाने 70 व्या वर्षीही लोक तरूण दिसू शकतात आणि 90 वर्षापर्यंत जगू शकतात. या संशोधनानुसार सर्वाना केवळ 20 ते 25 मिनिटं फिरणं किंवा वॉकिंग आणि खाण्यापिण्यात चांगले बदल केले पाहिजे. व्यायाम केल्याने बुद्धीही तल्लख होते.