गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2016 (15:29 IST)

कॉफी पिण्याची योग्य वेळ

ऑफिसमध्ये अनेकजण चहा किंवा कॉफी मोठ्या प्रमाणावर पितात. कॉफी प्यायल्यामुळे काम करण्याची क्षमता वाढते, अशी अनेकांची समझ आहे. पण कॉफी प्यायल्याने कामाची क्षमता वाढते, हा समज चुकीचा असल्याचे अनेक संशोधनात समोर आले आहे कामाच्या ठिकाणी आपण किती कॉफी पितो हे जर आपल्याला माहीत नसेल, तर कॉफीचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. कॉफी प्यायल्याने फक्त मानसिकता बदलते. सहकर्मचार्‍यांसोबत एकत्र कॉफी प्यायल्याने ऊर्जा तयार होते. पण कामाचा तणाव आहे, त्यावेळेस कॉफी पिल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तणावामध्ये असताना कॉफी प्यायल्याने रक्तदाब वाढतो. 
 
कॉफी पिण्याचे प्रमाण योग्य असावे आणि तणाव दूर करण्यासाठी कॉफी प्यायल्याने त्याचा फायदा होत नाही. कॉफी पिण्यासाठी सहकर्मचार्‍यांसोबत तुम्ही जाऊन ती पिऊ शकता. पण त्याचे अतिसेवन करू नये.