गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 (14:31 IST)

कॉस्मेटिकमुळे कॅन्सरची शक्यता

सध्याच्या काळात सर्व सर्रास कॉस्मेटिक्सचा वापर करतात. पण फॅशनेबल राहण्याच्या नादात आपलं आरोग्य तर बिघडत नाहीये याकडे ही लक्ष द्याल हवं. कॉस्मेटिक्समध्ये घातल्या जाणार्‍या रसायनांचा विचार केला तर यात किती तथ्य आहे. हे लक्षात येईल. याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यानुसार शेंपू, विविध प्रकाराची लोशन्स, मॉईश्चरायझरमधल्या घातक रसायनांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका बर्‍याच प्रमाणात वाढला आहे. 
 
कॉस्मेटिक्समध्ये असलेलं पेराबेन्स रसायन आरोग्यासाठी घातक ठरतं. या रसायनामुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर तसंच गर्भाशयाशी संबंधित विकार होण्याची शक्यता असते, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या रसायनामुळे महिलांच्या शरीरात ब्रेस्ट कॅन्सर तसंच गर्भाशयाशी संबंधित विकारांच्या हार्मोन्सची निर्मिती झाल्याने महिलांनी काळजी घेण्याची गरज आहे.
 
घातक असलेले हे पेराबेन्स रसायन शेंपूपासून शेव्हिंग क्रीमपर्यंत सुमारे 85 टक्के कॉस्मेटिक्समध्ये मिसळण्या येतं. म्हणूनच कोणतेही कॉस्मेटिक उत्पादन घेताना त्यातल्या घटक पदार्थांची माहिती करू घ्या. पेराबेन्सचं कॉस्मेटिकमधलं प्रमाण तपासून पहा.
 
याऐवजी हर्बल उत्पादनांचा वापर करून ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतं.