शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

कोलेस्ट्रॉल मित्र आणि शत्रूही

WD
कोलेस्ट्रॉल हे नाव ऐकूताच हृदय धडधडतं. कारण ह्रदयाशी संबंधित आजार डोळ्यांपुढे नाचू लागतात. पण कोलेस्ट्रॉल हा घटक शरीराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतो. शरीरात याचे प्रमाण असंतुलित झाल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात.

कोलेस्ट्रॉल शरीराच्या प्रत्येक पेशीसाठी आवश्यक घटक आहे. कोलेस्ट्रॉलशिवाय शरीर हार्मोन्स तयार करू शकत नाही. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डीची निर्मिती व स्नायू तंतूंचे संरक्षण त्वचा करू शकत नाही.

NDND
कोलेस्ट्रॉल मेणाप्रमाणेच टणक असते. ते रक्तात मिसळून धमण्यांद्वारे शरीरात वाहते. शरीरात 5 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. कायलो मायक्रोन, व्हीएलडीएल (व्हेरीलो डेंसिटी लिपो प्रोटीन), आयडीएल (इंटरमिडीयरी डेंसिटी लिपोप्रोटीन), एलडीएल (लो डेंसिटी लिपोप्रोटीन) आणि एचडीएल (हाई डेंसिटी लिपोप्रोटीन).

कोलेस्ट्रॉलची गरज का?
कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरात महत्त्वाचे हार्मोन्स बनतात. हे शरीराचे संक्रमणापासून संरक्षण करते. कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरात बायल एसिडची निर्मिती होते. आतड्यांतून वसा शोषणासाठी त्याची मदत होते. कोलेस्ट्रॉल हाडांच्या विकासासाठी मदत करणाऱ्या व्हिटॅमिन डीची निर्मिती करण्यात मदत करते. याशिवाय स्नायू तंतूच्या संरक्षक पेशींच्या निर्मितीत मदत करते. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असणार्‍यांना व‍िव‍िध आजारांना सामोरे जावे लागते.

कोलेस्ट्रॉल धोकादायक केव्हा असते?
कोलेस्ट्रॉलचे एक निश्चित प्रमाण शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. पण रक्तातील याचे प्रमाण 250 मिलीग्रॅम प्रती डेसीलीटर किंवा यापेक्षा जास्त होणे धोकादायक होऊ शकते. धमण्यांमध्ये जास्त कोलेस्ट्रॉल जमल्याने रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात व हृदयासंबंधीत आजार उद्भवू लागतात. धमण्यांमध्ये होणार्‍या रक्तप्रवाहात जास्त अडथळे येण्याने ह्रदयविकाराचा धक्का बसू शकतो. धमण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल बनल्यामुळे वेळेच्या आधी म्हातारपण येते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने पित्ताच्या पिशवीत खडे जास्त प्रमाणात बनतात.

जास्त धोका कोणासाठी?
* प्रमाणापेक्षा लठ्ठ लोकांसाठी, रक्तदाबाचा व मधुमेहाचा आजार असणार्‍या लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढते.
* एकाच जागी बसून राहणारे व पायी न चालणार्‍यांचे कोलेस्ट्रॉल वाढते.
* मांसाहारी पदार्थ, अंडी, तूप, तेलकट पदार्थ खाणार्‍या लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढते.
* सिगारेट ओढणारे व जास्त प्रमाणात दारू पिणार्‍या लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढते.

हे प्रमाण कमी कसे कराल?
जेवणात प्रोटीन, कार्बोहायड्रेड व वसाचा योग्य प्रमाणात समावेश करा. भाज्या शिजविण्यासाठी शेंगदाणा तेल, सरसाचे तेल, सोयाबीन, तिळाचे तेल यांचा वापर करा.
आहारात मांसाहारी पदार्थ व पनीर कमी करा.
सिगारेट व दारू बंद करा.
आहारात ताजी फळे व हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा.
तणावापासून दूर रहा.
नियमित व्यायाम करा.

वयानुसार कोलेस्ट्रॉ
जन्माच्या वेळी बाळाच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 70 मिलीग्रॅम प्रती डेसीलीटर असते. एका वर्षाच्या वयात हे प्रमाण 150 मिलीग्रॅम प्रती डेसीलीटर असते. 17 वर्षे वयापर्यंत यात वाढ होत नाही. यानंतर मात्र हे प्रमाण वाढायला लागते. एका वयस्कर व्यक्तीच्या शरीरात हे प्रमाण 200 मिली ग्रॅम प्रती डेसीलीटर असावे व एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 50 मिलीग्रॅम प्रती डेसीलीटर असावे.