मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (15:00 IST)

जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरत असाल तर..सावधान!

गरम पदार्थ खाणं कुणाला आवडत नाही.. पण, तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करत असाल तर सावधान! मायक्रोवेव्ह सेफ असणार्‍या प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये जेवण गरम करत असाल तर याचा परिणाम नक्कीच शरीराला अपायकारक ठरू शकतो. ‘डेली मेल’ वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्मेटल हेल्थ सायन्स’ नं मायक्रोवेव्ह न वापरण्याच्या काही सूचना केल्यात. 
 
यामध्ये, मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या भांडयांमध्ये जेवण गरम करण्यानं यामध्ये असणारे केमिकल, इनफर्टिलिटी, जाडेपणा, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असं म्हटलं गेलंय. प्लास्टिकच्या भांडयांमध्ये आढळणार्‍या अँडोक्राइन डिसरप्टिंग केमिकल्स (ईडीसी) शरीराला अपायकारक ठरू शकतं. 
 
मायक्रोवेव्हमध्ये या भांडयामध्ये जेवण गरम करताना यातील केमिकलचा संपर्क सरळ सरळ अन्नाशी होतो. आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्लास्टिकच्या भांडयांमध्ये जवळपास ८०० प्रकारांच्या रसायनांचा वापर होतो.. आणि ही रसायनं स्वास्थ्यासाठी अपायकारक असतात. 
 
ईडीसीमुळे शरीरातील हार्मोनल बॅलन्स बिघडू शकतो.. यामुळे, ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. यापूर्वीही, अनेक शोधांमध्ये प्लास्टिकच्या भांडयांमध्ये आणि बाटल्यांमध्ये आढळणारे केमिकल्स आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, हे अनेकदा सिद्ध झालंय.