शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

टॅब्लेट आपली झोप उडवू शकतो

FILE
रात्री झोपण्याअगोदर टॅब्लेट कॉम्प्युटरचा उपयोग तुमच्या झोपेचे खोबरे करू शकते. यासंबंधीचे वृत्त 'द टेलीग्राफ' मध्ये प्रकाशित झाले आहे.

झोप येण्यासाठी लागणार्‍या रसायन निर्मितीत टॅब्लेट अडथळा निर्माण करतो, असे स्पष्ट झाले आहे. वरिल अभ्यासात बहुतांश लोक झोपण्याअगोदर मेल चेक करणे, फेसबुक पाहणे किंवा इतर कामांसाठी बिछान्यावर टॅब्लेट घेऊन झोपतात, असे आढळून आले आहे.

टॅब्लेट मधून निघणारा निळा प्रकाश रात्रीची झोप खराब करू शकते, असा इशारा संशोधनकर्त्यांनी दिला आहे. हा प्रकाश दिवसाच्या प्रकाशासारखा दिसत असल्याचे अद्याप दिवसच असल्याचा संदेश मेंदुस प्राप्त होतो.

झोप येण्यासाठी आवश्यक रसायन मेलाटोनिनची निर्मिती कमी करण्याचे काम हा नीळा प्रकाश करतो. हे संशोधन एम्पाइड एर्गोनोमिक्स नावांच्या जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे.