शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , गुरूवार, 27 मार्च 2014 (15:00 IST)

डिप्रेशन, एंग्जाइटीमुळे लवकर पडतात दात

डिप्रेशन (ताण-तणाव) आणि एंग्जाइटी (चिंता) आरोग्याकरिता खूपच खतरनाक ठरतात. त्यांचा हळूहळू शरीरावर परिणाम होऊ लागतो. शरीराचे सौंदर्य संपविण्यात हा कोणतीच कसूर बाकी ठेवत नाही. संपूर्ण शरीरावर याचा खूप वाईट परिणाम होतो, हे काही दिवसांतच दिसून येऊ लागतो. इतकेच नव्हे, तर हा तोंडात असलेल्या मजबूत दातांनाही नष्ट करून टाकतो. होय, हे खरे आहे. विश्‍वास बसत नाही ना की, डिप्रेशन आणि एंग्जाइटीचा दातांशी काय संबंध?

नुकत्याच करण्यात आलेल्या एका प्रयोगात असे सिद्ध झाले आहे की, ताण-तणाव आणि चिंतेमुळे दात वेळेआधीच पडतात. शोधकर्त्यांनी दातांच्या नष्ट होण्याचा आणि ताण-तणाव -चिंतेमधील संभावित संबंधांची माहिती मिळविण्याकरिता हा प्रयोग केला होता. या प्रयोगात १९ वर्षे वा त्यापेक्षा अधिक वयाच्या ७६ हजार २९२ लोकांना सहभागी करण्यात आले होते.