मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. सेक्स लाईफ
Written By

देहगंध आणतो दोन व्यक्तींना जवळ

दोन व्यक्तींना जवळ आणण्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तारूण्यात विरूध्दलिंगी आकर्षण, विवाहानंतरचे पति-पत्नीमधील प्रेम किंवा आईची ममता व बाळाबरोबरचे तिचे नाते या सर्व गोष्टींमध्ये शरीरातून बाहेर पडणार्‍या विशिष्ट रसायनांचे कारण असते. या रसायनांमुळे जो देहगंध निर्माण होतो त्याचा या संबंधावर परिणाम होत असतो. 
 
संशोधकानी म्हटले आहे की, प्रेमाच्या खेळात 'दिल' कुठेही नसते. हा सर्व केमिकल्सचा खेळ आहे. ही रसायनेच प्रेमाचे बीज रोवतात आणि एक दिवस हे बीज प्रेमलेत विकसित होते. अमेरिकेतील पश्चिम भागात आढळणारी उन्दरांची एक प्रजाती 'प्रेयरी बोल'चे याबाबत निरीक्षण करण्यात आले. 
 
हे उन्दीर रंग-रूप आणि अन्य काही बाबतीत सर्वसामान्य उन्दरांपेक्षा वेगळे असतात. ते प्रेमातही लवकर पडतात, असे दिसून आले. किमान बारा तास उन्हात राहिल्यावरच या प्रजातीमधील नर-मादी एकत्र येतात. त्यांच्या शरीरातून विशिष्ट रसायने स्त्रवत असतात व त्यामुळे त्यांच्यामधील संबन्धांना सुरूवात होते. मेंदूमधील काही रसायनेही अशा संबन्धांसाठी कारणीभूत ठरत असतात.