मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (17:48 IST)

पायांकडे लक्ष द्या.!

पायांपाशी ध्यान नित्य असू द्यावे, हे वाक्य कोणत्याही वयात व कोणत्याही स्थितीत विसरू देऊ नका. पाय नेहमी झाकलेले असल्याने कित्येकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. पण आपले सारे शरीर पेलणारे, उभे करू शकणारे पाय नेहमीच लक्षात ठेवले पाहिजेत. आपल्याकडे साहित्यात स्त्रीच्या सुंदर पायांची वर्णने आली आहेत. चीन व जपानमध्ये स्त्रीच्या सुंदर पायांसाठी लहानपणापासून विशेष प्रय▪केले जातात. पण पाय केवळ आकर्षक, सुंदर असून चालत नाहीत, ते सुदृढही असावे लागतात. त्यामुळे पायांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.

पावलांना आरामदायी वाटेल अशा चपला, बूट निवडा. बोटांपाशी त्या सैल असू द्या.
 
* उंच टाचांच्या व पुढे निमुळत्या चपला पायांवर अनावश्यक ताण देतात. शरीराचा तोल सावरण्यासाठी पायावर ताण येतो. पावलांचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे अशा चपला टाळाव्यात.
 
* आठवड्यातून दोन वेळा पावलांना बदाम तेलाने अगर खोबरेल तेलाने मालीश करा. तेल अर्धा तास जिरवा. वरून खाली अशा एकाच दिशेने हात फिरवा.
 
* उन्हाळ्य़ात पायांना घाम येतो. त्यामुळे वास येतो. रोज सकाळी आंघोळीनंतर व सायंकाळी थंड पाण्याने पाय स्वच्छ धुऊन टाल्कम पावडर लावावी.
 
* एक ते दोन दिवसाआड शेंगदाण्याच्या कुटामध्ये मीठ मिसळून गुडघ्याला चोळा. नंतर जवसाच्या तेलात व्हिनेगर मिसळून त्याचे हलक्या हाताने मालीश करा.
 
* सतत बराच वेळ उभं राहू नका. पाय थकले असतील तर कोकम तेलाने किंवा खोबरेल तेलाने पावलांना मालीश करा. पाय थोडे उंचावर ठेवून झोपा.
 
* काही वेळ गरम पाण्यात, मग थंड पाण्यात असं करा. गरम पाण्यात इप्सम सॉल्ट टाकले तर उत्तमच. त्यानंतर पायाला युडी कोलनं चोळा.