शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

या 14 प्रकारे 5 मिनिटांत तणावापासून मुक्ती

* ग्रीन टी प्या
ग्रीन टी थियेनिनचा स्रोत असल्यामुळे याचे सेवन करण्याने राग कमी होतो.

* मध
मधात डोक्यातील गरमी कमी करण्याची क्षमता असती. फक्त एक चमचा मधाचे सेवन केले तरी तणावातून मुक्ती मिळते.

* आवडती गाणी
आपली आवडती गाणी ऐकण्याने तणावावर कंट्रोल होतो. ऐकणे शक्य नसेल तर तुम्ही स्वत: ती गाणी गाउ शकता.

* च्यूइंगम
फक्त 5 मिनिटं च्यूइंग चावल्याने कोर्टिसोल लेवल कमी होतो आणि तणावापासून मुक्ती मिळते.

* काऊंटडाऊन
राग आवरण्यासाठी मनात उलट गिनती म्हणायला सुरुवात करावी. 10 पासून सुरू केल्यावर 1 पर्यंत येता येता तुमचा राग आपोआप कमी होईल.
* चॉकलेट
डिप्रेशनमध्ये चॉकलेट खाण्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल लेवल बरोबर राहतं. चॉकलेट खाण्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. चॉकलेटमधील असलेले फिनाइल इथाइल अमीन (पीइए) मुळे शरीरात बनणारे रसायन आपल्याला तणावातून बाहेर येण्यास मदत करतात.


* उशीवर डोके ठेवा
तणाव असल्यास झोप येणं शक्यचं नाही म्हणून फक्त डोळे मिटून उशीवर 5 मिनिटं डोकेठेवून विश्रांती घ्या, बरं वाटेल.

* आठवा एखादे रमणीय स्थळ
रिलॅक्स व्हायचे असेल तर असं ठिकाण आठवा जिथे तुम्हाला खूप आवडतं. वाटल्यास ऑनलाईन तिथले फोटो बघा आणि डोळे बंद करून दीर्घश्वास घेऊन विचार करा की आपणं त्या रमणीय स्थळी आहोत. तिथे फिरत आहोत.

* उजळात किंवा उन्हात जा
अंधारात तणाव वाढतो. म्हणून अश्यावेळी अंधारात न बसून आपल्या गच्चीवर किंवा गॅलरीत उभे राहवे. किंवा उन्हात फिरावे.

* लिहून काढा
आपणं ज्या गोष्टीमुळे तणावात आहोत ती गोष्ट लिहून काढा. पुष्कळदा लिहिण्याने राग दूर होतो आणि तणावापासून मुक्ती मिळते.
* तेल लावून केस विंचरा
तणावात असताना डोक्याला तेलाची मसाज करून केस विंचरावे. 10 ते 15 वेळ्या केसांमध्ये ब्रश फिरविण्याने तणावापासून मुक्ती मिळते.

* फळांचा राजा आंबा
आंब्याला असेचं फळांचा राजा नाही म्हणतं. त्यातील लिनालूल नाम पदार्थ तणाव कमी करतो. म्हणून आंबा खाणे फायदेशीर ठरेल.


* फुलांचा सुवासिक वास
आपल्या आवडत्या सुगंधी फुलांचा वासदेखील तणाव दूर करण्यात मदतगार ठरतो.

* फॉकी प्या
कॉफीची सुंगधदेखील डिप्रेशन कमी करण्यात मदत करते. तज्ज्ञांचे म्हटले आहे की कैफीनमुळे तणाव कमी होतो.