शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

लठ्ठपणा कमी करतो कढीपत्ता

भारतीय जेवणात वापरण्यात येणारे सगळे पदार्थ शरीरात औषधीच्या रूपात काम करतात. त्यातूनच एक आहे कढीपत्ता, ज्याने कढी आणि आमटी चविष्ट बनते. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे 100 ग्राम कढीपत्त्याच्या पानात 66.3 टक्के आर्द्रता, 6.1 टक्के प्रोटीन, एक टक्का चरबी, 16 टक्के कार्बोहाइड्रेट, 6.4 टक्के फायबर 4.2 टक्के खनिज आढळतं. पाहू कढीपत्ता सेवन केल्याने काय फायदे होतात ते....
 
* कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं.
नियमित कढीपत्ता सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
दर रोज कढीपत्ता चावल्याने लठ्ठपणा कमी होतो.
मधुमेही रुग्णाने सतत तीन महिने रोज सकाळी कढी पत्ता खाल्ल्याने फायदा होईल.
कढी पत्ता खाल्ल्याने रोगांवर नियंत्रण राहतं. 
पुढे वाचा केसांसाठी ही फायदेशीर आहे कढीपत्ता

* केस गळत असल्यास कढीपत्ता आहारात सामील करावा. कढी पत्ता खायला आवडत नसल्यास त्याची पावडर वापरू शकता.
यात लोह तत्त्व, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं. याचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते.

पोटातील रोगांवर फायदा करतो कढीपत्ता
 
* पोटातील रोगांवर मात करण्यासाठी ताकात कढीपत्ता घालून पिण्याने आराम मिळतो. किंवा कढीपत्त्याचा रस काढून त्यात लिंबू पिळून थोडीशी साखर मिसळून सेवन करावे.
कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना कढीपत्ता वापरावा ज्याने पोटातील रोगांपासून आराम मिळतो.

कढीपत्त्याचे इतर फायदे
 
* कढीपत्त्याने डोळ्यांची ज्योती वाढत असून याचे सेवन केल्याने काचबिंदू सारखे रोग दूर होत नाही.
तोंडातील छाले आणि डोकेदुखीवर कढीपत्त्याचे ताजे पानं लाभदायक असतात.
कढीपत्ता कफ बाहेर काढण्यात मदत करतो. कफ दूर करण्यासाठी एक चमचा मधात एक चमचा कढी पत्त्याचा रस मिसळून सेवन करावे.
कढीपत्ता पावडरमध्ये लिंबाची 2-3 थेंब आणि थोडीशी साखर मिसळून खाल्ल्याने उल्टीचा त्रास नाहीसा होतो.