गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: लंडन , मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (12:15 IST)

लठ्ठपणावर 'कॉफी' उपयुक्त

जगभरातच लठ्ठपणा ही समस्या आता गंभीर बनू लागली आहे. यावर आता कॉफी उपयुक्त असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. 
 
कॉफीत असणारे एक रसायन लठ्ठपणासंबंधीच्या आजाराशी लढणे आणि वजन वाढ रोखण्यासाठी उपयुक्त आहे. या रसायनाला क्लोरोजिक आम्ल अथवा सीजीए असे ओळखले जाते. 
 
या संशोधनाचे नेतृत्व करणार्‍या युजीएचे योंगजी मा म्हणाले, ऐसीजीए' हे एक अँटिऑक्सिडेंट रसायन असून ते चरबी कमी करण्याचे काम करते. याशिवाय ते इन्सुलिन प्रतिरोधी क्षमताही वाढवते. संशोधकांनी 15 आठवड्यापर्यंत जास्त कॅलरिज असलेले खाणे उंदरांना दिले. याशिवाय आठवड्यात दोनवेळा 'सीजीए'चा डोसही दिला. आश्चर्य म्हणजे सीजीएने उंदरांचे वजन वाढण्यापासून रोखलेच, याशिवाय रक्तातीलसाखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे कार्य केले.