शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (12:16 IST)

समाधानासाठी सावकाश जेवण करा

जेवण जेवताना नेहमी सावकाश जेवावे कारण हळू जेवल्याने समाधान मिळते, तसेच पोटाला हवे तेवढेचे अन्न पोटात जाते. सावकाश जेवण करणार्‍या लोकांचे बॉडी मांस इंडेक्स हे पटापट जेवण करणार्‍या लोकांपेक्षा कमी असते, पण या मागचे कारण अजूनही समजू शकले नाही, असे एका अभ्यासातून समजते.

हा अभ्यास करण्यासाठी ब्रिस्टल विद्यापीठाच्या शोधकत्र्यांनी काही स्वयंसेवकांना नळीच्या साहाय्याने दोन भिन्न गतीने 400 मिलीमीटर टॉमेटो सूप पाजले. पहिल्या गतीत 11.8 मिलीमीटर सूप प्रत्येकी दोन सेकंदानंतर पाजून नंतर चार सेकंदांचा आराम दिला गेला. दुसर्‍या गतीत 5.4 मिलीमीटर सूप एका सेकंदात पाजून त्यानंतर दहा सेकंदाचा आराम दिला गेला. त्यांना सूप प्यायल्यानंतर लगेचचे दोन तासांनी प्रश्न विचारले गेले की त्यांना किती समाधान मिळाले. यात सावकाश सूप पिणारे अधिक समाधानी असल्याचे म्हटले आहे.