गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2015 (12:39 IST)

स्त्रियांमध्ये हृदयघाताचा धोका वाढण्याचे मुख्य कारण घटस्फोट

अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनातील ड्युक विद्यापीठात हल्ली झालेल्या एका संशोधनानुसार, समाधानी वैवाहिक आयुष्य जगणार्‍या महिलांच्या तुलनेत घटस्फोटित महिलांमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो व पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये तो दुप्पट असतो. अशा महिलांमध्ये ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका २४ टक्क्यांनी वाढतो. महिला आपल्या नात्याबाबत एवढय़ा संवेदनशील असतात की, ते संपुष्टात आल्यामुळे तणाव, दु:ख व ह्रदयविकार वाढविणार्‍या अनेक मानसिक स्थितीतून जातात. दोन व त्याहून जास्त घटस्फोटांनंतर विवाहित महिलांच्या तुलनेत हा धोका आणखी वाढतो. अर्थात आयुष्याच्या जोडीदारापासून विभक्त झालेल्या पुरुषांमध्येही ह्रदयविकाराचा धोका वाढतो, पण तो महिलांच्या तुलनेत कमी असतो. महिलांमध्ये दुसर्‍या विवाहानंतरही हा धोका कायम असतो, दुसरीकडे पुरुषांचे ह्रदय मात्र दुसर्‍या विवाहानंतर आणखी ठणठणीत होते. १६ हजार पुरुष व महिलांचे गेली १८ वर्षे अध्ययन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यांच्यातील एक-तृतियांश जणांचा किमान एकदा घटस्फोट झाला. त्यापैकी १२00 लोकांना ह्रदयविकाराचा झटका आला.