गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

हिरवी मिरची -ग्रीन चिलीज

आपल्या स्वयंपाकातील अगदी अविभाज्य घटक म्हणजे हिरवी मिरच्‍या आहे. हिचे औषधी गुण मात्र आपल्याला फारसे माहित नसतात. कॅपसॅसिन या द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा आला आहे. हे तीक्ष्ण द्रव्य रक्तास गोठ्यापासून वाचवणार्‍या शरीरातील यंत्रणेला कार्यान्वित करणारे आहे.
 
या गुणधर्माचा उपग पक्षाघात व हृदयविकाराचा झटका यासारख्या व्याधींच्या संरक्षणात्मक म्हणून होऊ शकतो. हिरव्या मिरचीत फॉलिक अ‍ॅसिड व 'क' जीवनसत्व आहे. वाढलेला कोलेस्टेरॉल, वाढलेले होयोसिस्टीन, उच्च रक्तदाब, मधुमेह हे विकार असणार्‍यांनी पावसाळ्यात, हिवाळ्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मिरची-कोथिंबीर घालून केलेल्या हिरव्या चटण्या यांचा आहारात समावेश करावा. मिरची ही तीक्ष्ण-उष्ण गुणाची असल्याने तिचा जरूरीपेक्षा अधिक वापर मात्र त्रासदायक ठरू शकतो. विशेषत: पित्त प्रकृती, अ‍ॅसिडिटी, कोलायटीस, मूळव्याध असणार्‍यांनी मिरची खूप कमी खावी. बारीक गडद हिरी लवंगी मिरची ही अधिक तिखट असते, तर जाड व पोपटी हिरवा रंग असलेली मिरची कमी तिखट असते.