शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Health Tips : पावसाळ्याच्या तापात घ्या खबरदारी

पावसाळ्याचा मोसम आनंदी करत असला तरी रोगांच्या संक्रमणासाठी हाच मोसम जबाबदार असतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि ताप अगदी सामान्य आजार आहे. बघू या सगळ्यांपासून आपण स्व‍त:चे रक्षण कसे करू शकतो. 


 
रोग पसरण्याचे कारण
जागोजागी साठणार्‍या पाण्याने रोगांना आमंत्रित मिळतं
पावसात भिजल्याने
विषारी किटकांमुळे खाद्य पदार्थ दूषित होण्याने

पावसाळ्यात येणार्‍या तापाचे लक्षणे

डोके दुखी आणि अंग ठणकणे
लघवीचा रंग लाल होणे
कळमळणे
तहान लागणे
तोंड कडू होणे
अस्वस्थता
सांधे दुखणे

काळजी
ताप आल्यावर रूग्णाला हवेशीर खोलीत झोपवावे.
हलकं फुलकं आणि सुपाच्य जेवायला घालावे.
दूध, चहा किंवा मोसंबी रस देऊ शकता पण तेल आणि मसालेदार खाद्य पदार्थ देऊ नये.
जास्त मेहनत न घेता शरीराला शक्यतो आराम लाभदायक ठरेल.