गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:27 IST)

डाळिंबाचे फायदे, जाणून घेतल्यावर दररोज खाल

डाळिंबाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज डाळिंब खायला हवं. डाळिंबात ओमेगा 5 कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन ए,सी,ई, रायबोफ्लेवीन, लोह, फॉलिक एसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड, फॉस्फोरस आणि थायमिन सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरास निरोगी ठेवण्यास मदत करतं. आज आम्ही आपल्याला या लेखाच्या माध्यमातून डाळिंबाचे गुणधर्म आणि फायदे सांगत आहोत. बऱ्याच आजारांमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर असतात.
 
* अशक्तपणा दूर होतो - 
डाळिंबाचे सेवन अशक्तपणा असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. दररोज डाळिंब खाल्ल्यानं शरीरातील रक्ताची पातळीत वाढ होते. अशक्तपणा असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. डाळिंबाचा सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
 
* प्रतिकारक शक्ती बळकट होते -
डाळिंबाचं सेवन केल्यानं प्रतिकारक शक्ती बळकट होते. प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज डाळिंब खावे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला दिला जातो. आपण आपली प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज डाळिंबाचं सेवन करू शकता.
 
* पचनाशी निगडित सर्व समस्या दूर होतात -
डाळिंबाचं सेवन केल्यामुळे पचनाशी निगडित सर्व आजार आणि त्रास दूर होतात. डाळिंब खाल्ल्यानं पचनतंत्र बळकट होतं. पचनाशी निगडित सर्व त्रासांना दूर करण्यासाठी दररोज डाळिंब खावं.
 
* हृदयरोगांच्या रुग्णांसाठी फायदेशीर -
हृदयरोगाचा रुग्णांसाठी आपल्या आहारात डाळिंब घेतले पाहिजे. डाळिंबाचं सेवन हृदयरोगाचा रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतं. डाळिंब खाल्ल्यानं कॉलेस्ट्रालची पातळी नियंत्रणात राहते. हृदयाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज डाळिंब खावे.
 
* टीप - हा लेख निव्वळ आपल्या माहितीसाठी आहे, आपण एखाद्या आजाराने ग्रस्त असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.