गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (16:22 IST)

झोपायला जात असाल तर ह्या चुका करू नये, उडू शकते झोप!

स्ट्रेसफुल दिवसानंतर प्रत्येकाला रात्री गाढ झोपेची गरज असते. अशात झोप न आल्यामुळे तुम्ही परेशान होऊन जातात. परेशान होऊ नका, झोप न येण्याचे कारण जाणून घ्या आणि चुका दुरुस्त करून चांगली झोप घ्या. आम्ही त्या चुकांबद्दल सांगत आहोत ज्या झोपण्या अगोदर नाही केल्या पाहिजे.  
 
सर्वात आधी तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की बिस्तरावर आल्यानंतर देखील तुम्ही स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, आयपॅडवर काम सुरू ठेवत असाल तर तुम्हाला लवकर झोप येणार नाही. झोपायला जाण्याअगोदर कुठलेही मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला मेसेज करणे किंवा  कुठल्याही सामूहिक चॅटचे भागीदार होण्याची चूक करू नका.   
 
झोपण्याअगोदर टीव्ही पाहू नका. तुमचा आवडता कार्यक्रम किंवा चित्रपट तर बिलकुलच बघू नका. असे केल्याने तुम्ही त्यात अडकून पडाल आणि तुम्हाला टीव्हीत मजा येऊ लागले, ज्याने तुमची झोप उडून जाईल. 
 
झोपण्याअगोदर व्यायाम केल्याने देखील झोप उडून जाते. जर तुम्ही व्यायाम केल्यानंतर झोपत असाल तर झोपण्याचा काही तास अगोदर व्यायाम करून घ्या. ज्याने तुम्हाला नक्कीच गाढ झोप येईल.   
 
जर पाळीव जनावरांसोबत झोपत असाल तर असे करणे लगेचच बंद करा. कुत्रे किंवा मांजरीसोबत झोपल्याने तुमची झोप अपुरी राहते कारण हे जनावर रात्रभर चुळबूळ करत राहतात.  
 
जर तुम्ही खोलीचा तापमान जास्त करून झोपत असाल तर त्याला थोडे कमी करून झोपा. शरीराचा तापमान रात्री कमी होतो आणि खोलीत थोडी थंडी असल्यामुळे आपोआप तुमचा हात ब्लॅकेटकडे जाईल आणि ते पांघरून तुम्हाला नक्कीच चांगली झोप येईल.