गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

स्मार्टफोनच्या अतिवारपराने अकाली वृद्धत्वाचा धोका

लंडन- अति सर्वत्र वर्जयेत हे बर्‍याच वेळा विसरले जाते आणि लोक कशाच्या तरी आहारी जातात. अर्थातच त्याचा परिणाम काही चांगला होत नाही. सध्याही स्मार्टफोनचे अनेकांना व्यसनच जडले आहे. अशा लोकांच्या हालचाली आय ट्रॅकरच्या सहाय्याने संशोधकांनी नोंदवून त्याचा अभ्यास केला आहे. या प्रकारच्या 252 प्रकारच्या हालचाली वैज्ञानिकांनी नोंदवून त्याचे अध्ययन केले तेव्हा वेळेअगोदर वृद्धत्व येण्यामागे स्मार्टफोनचा अतिवापर असल्याचे त्यांना आढळून आले आहे.
 
संशोधकांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफोनवर बोलत बोलत रसत्यातून चालताना तरूणवर्ग 80 वर्षांच्या वृद्धाप्रमाणे हालचाली करतो. म्हणजे तो अतिहळू चालतो. प्रत्यक्षात फोनवर बोलत नसला तरी मेसेज वाचणे, पा‍ठविणे असे उद्योग तरी करतोच. त्यामुळे त्याचा चालण्याचा वेग आपोआपच कमी होतो.
 
शिवाय फोनच्या अतिवापराने मान, कंबर, पाठ यांची दुखणी वाढतात, शिवाय फोनमधून बाहेर पडणार्‍या किरणांमुळे डोळ्यांच्या विकारातही वाढ होते. या शिवाय मोबाईल यूजर्ससाठी जगभरातील सरकारांना पैसे खर्च करून वेगळ्या सुविधा घाव्या लागतात ते वेगळेच. चीनमध्ये तसेच नेदरलँडमध्ये त्यांच्यासाठी वेगळे पेवमेंट आहेत. मोबाईल फोनमुळे नाते संबंध कमी होत आहेत. कुटुंबातील संवादही कमी होतो आहे.