बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (19:39 IST)

Cold water Almonds दिवसाची सुरुवात करा थंड पाणी, बदाम खाऊन

आरोग्यपूर्ण राहण्यासाठी दिवसाची सुरूवात थंड पाणी, बदाम आणि व्यायामानं करावी. दिवसभर आपण ताजेतवाने राहाल. एका तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे. एका फिटनेस सल्ला कंपनीनुसार, चांगल्या आरोग्यासाठी काही खास टिप्स..
 
सकाळी उठल्याबरोबर अर्धा लिटर थंड पाणी प्या. रिकाम्यापोटी थंड पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझम वाढण्यात मदत होते. 
रिकाम्या पोटी सहा ते दहा बदाम आणि अक्रोड खावेत, त्यानं इन्झाइम्स तयार होतात आणि पचनक्रिया चांगली होते. 
सकाळचा नाश्ता जरा हेवी घ्यावा म्हणजे दिवसभर आपली ऊर्जा टिकून राहते. यात काबरेहायड्रेट आणि प्रोटीन भरपूर असले पाहिजे. 
सकाळी थोडा व्यायामही आवश्यक आहे. यामुळं स्नायूंमध्ये लवचिकता राहते. जितकं शक्य असेल तितकं चालावं, यामुळं अधिकच्या कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. 
बदाम आणि अक्रोड ऊर्जेचा भंडार आहेत. दिवसभरात थोडे शेंगदाणे खात राहावे. ध्यान आणि विश्रंतीवर लक्ष केंद्रित करावं. यामुळं मानसिक शांती मिळते आणि विचार करण्याची वृत्तीही वाढते.