गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

कधी ऐकले आहे ताण घेण्याचे फायदे? जाणून घ्या 5 लाभ

ताण घेणे आरोग्यासाठी अतिशय घातक असतं, हे तर सर्वांनाच माहीत आहे. परंतू थोड्या प्रमाणात घेतलेला ताण फायदेशीर ठरू शकतं. हे जाणून आपल्याला आश्यर्च वाटतं असलं तरी हे खरं आहे. जाणून घ्या याचे कारण आणि लाभ:

1. एका शोधाप्रमाणे कमी प्रमाणात घेतलेला ताण आपल्या मेंदूसाठी नुकसानदायक नसून फायदेशीर ठरू शकतो. कमी वेळाचा ताण निरोगी मेंदू पेशींचं निर्माण करतं आणि आपली जागरूकता वाढवतं.
 
2. ताण यासाठी देखील फायदेशीर आहे कारण हे आपल्या मेंदूतील पेशींना विकसित होण्याची संधी देतं ज्याने मानसिक क्षमतेतदेखील वृद्धी होते.

3. कमी प्रमाणात ताण मस्तिष्कात एड्रिनेलिन निर्माण करण्यात मदत करतं, ज्याने आपल्या ऊर्जेचा स्तर सामान्यापेक्षा अधिक होतो. अश्या स्थितीत आपण अधिक ऊर्जावान होतात.
 
4. जसे अत्यंत ताण आपली रोग प्रतिकारशक्ती प्रभावित करतं तसेच हलका ताण आमच्या इम्यून सिस्टमला सक्रिय करून अवांछित घटकांपासून संरक्षण करतं.
 
5. ताण घेण्याचा प्रभाव आपल्या कार्यक्षमतेवर पडतो परंतू कमी प्रमाणात घेतलेला ताण एड्रिनल निर्मित करून आपला आत्मविश्वास वाढवतो आणि अनुभव देऊन जातं.