गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 एप्रिल 2014 (16:18 IST)

अंड्यातील बलक रक्तदाबावर प्रभावी

तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास आहे का? हा रक्तदाब, कसा कमी करायचा, असा काहींना प्रश्न पडला असेल तर, त्यावर साधा सोपा उपाय आहे. अंड्यातील बलक हा रक्तदाबावर गुणकारी ठरतो. तुमचं वाढलेलं ब्लडप्रेशर कमी करण्यास अंड्यातील बलक मदत करतो.

अंड्यातील पांढरा पदार्थ म्हणजे बलक. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यासाठी अंड्यातील हा पांढरा पदार्थ प्रभावशाली ठरतो. त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम जाणवत नाही. बुधारी अमेरिकन वैज्ञानिकांनी एका अभ्यासद्वारे यांचे समर्थन केले. एका रिर्पाटनुसार अंड्यातील पांढरा हिस्सा लोकप्रिय आहे. कारण ज्यांना कोलस्ट्रॉलचा त्रास आहे ते लोक अंड्यातील पिवळा हिस्सा खाण्याचे टाळतात.

आता तर अंड्यातील पांढरा हिस्सा हा उच्च रक्तदाब कमी करण्यास प्रभावी ठरतो. त्यामुळे आता अंडे खाताना जास्तीत जास्त पांढरा हिस्सा खाण्यावर भर द्या. अंड्यामुळे तुमच्या कॅलरीज वाढतात. तसेच शरीराला चांगली ऊर्जा ही अंड्यामुळे मिळते. त्यामुळे संड असो वा मंडे रोज खा अंडे, असे सांगितले जाते. मात्र ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी केवळ पांढसा हिस्साच खावा, असे अमेरिकन संशोधन यांचे सांगणे आहे.

अभ्यासकांच्या मते, अंड्यामध्ये पांढरा हिस्यामध्ये चांगली प्रोटीन गुणवत्ता आहे. बलकमध्ये मजबुत घटक असतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. कॅप्टोप्रिल (रक्तदाबावरील औषध) ची एक छोटी मात्रा एकदम प्रभावी आहे.