शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

आरोग्यावर भारी फॅशन

बॅग्स
हल्ली फॅशनच्या नावावर स्त्रिया मोठ्या-मोठ्या बॅग्स वापरतात आणि बॅग जेवढी मोठी असते तेवढेच त्यात सामान भरत राहतात. पण रोज इतक्या मोठ्या बॅग्स खांद्यावर लटकवून फिरणार्‍या स्त्रियांना कंबर आणि मानेत वेदना होऊ शकतात. याने चालीवर ही प्रभाव पडतो.

 

अंतर्वस्त्रे
स्त्रियांनी योग्य साइजचे अंतर्वस्त्रे निवडावे. साइज बरोबर नसल्यास मान, पाठ आणि स्तन दुखी सारख्या तक्रारी होऊ शकतात. तंग अंतर्वस्त्रे घातल्याने श्वास घेयला त्रास होऊ शकतो किंवा रक्तप्रवाह प्रभावित होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लूज अंतर्वस्त्रे वापरण्याने शरीराची बनावट बिघडते. लक्षात ठेवा रोज जाड स्ट्रिप असलेले गारमेंट्स वापरावे.

टाइट कपडे
पेंसिल स्कर्ट किंवा टाइट ड्रेस घातल्याने आपले पाय अकडू शकतात. अशातल्या ‍ड्रेसेसने गुडघे एकामेकाला चिपकतात आणि बॅलन्स करून चालणे कठीण होते. इतकंच नाही तर अश्या ड्रेसमध्ये वाकणेही शक्य नाही. नियमित असे ड्रेस घातल्याने स्लिप डिस्कची तक्रार होऊ शकते.

हिल्स
उंच हिल्सच्या चपला, सँडिल घालून आपण उंच आणि स्मार्ट तर दिसू शकता पण याने पाठ दुखी आणि संधिवात सारखे रोग उद्भवू शकतात. हिल्सच्या चपला नियमित वापरण्याने हिप्सची ठेवण बिघडू शकते.

झुमके
कानात लांब आणि हेवी झुमके किंवा लटकण घालणार्‍यांचे कान हळू-हळू खेचायला लागतात. या हेवीनेसमुळे कानाचे भोकं मोठे होतात आणि कधी-कधीतर कानाची पाळी फाटते. अशावेळी कॉस्मेटिक सर्जरीशिवाय पर्याय उरत नाही.