शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

उच्च रक्तदाब: कसा असावा आहार

कोणत्याही आजारात आहाराची पथ्ये सांभाळणे हे त्यांच्या औषधे घेण्या इतकेच महत्त्वाचे आहे. तसेच उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर दुष्परिणाम होऊ शकतात. उच्च रक्तदाब असरणार्‍यांना आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करायला नको. यात आहाराचे काही नियम पाळल्यास आजारावर ताबा ठेवता येईल.
 
* अधिक भोजन करू नये. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
 
* डेअरी उत्पाद, साखर, रिफाइंड खाद्य पदार्थ, आणि जंक फूड यापासून दूर राहावे.


* आहारात फळं आणि भाज्यांचा भरपूर उपयोग करावा. याव्यतिरिक्त लसूण, कांदा, साबूत धान्य आणि सोयाबीनचे सेवन करावे.
 
* मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, पपई, सफरचंद, संत्रं, जाम, अननस या फळांचे सेवन करावे.


* जेवण्यात वरून मीठ टाकण्याची सवय मोडावी. शक्योतर मिठाचे सेवन कमी करावे.
 
* चहा आणि कॉफी घेणे कमी करावे कारण यातील कॅफीन हानिकारक असतं.

* जेवण बनविण्यासाठी सोयाबीन तेल वापरावे.

* बाजरी, ज्वारी, मूग आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

 

* पालेभाज्यांच्या व्यतिरिक्त भोपळा, दुधी भोपळा, रिज भोपळा, परवल, आणि टिंडे या भाज्या खायला हव्या.
 
लिंबू आणि पुदिन्याचे नियमित रूपाने सेवन केले पाहिजे.

* दिवसातून कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे.
ताक आणि साय काढलेलं दूध घेऊ शकता.
बदाम, मनुका, ओवा आणि आलं यांचे सेवन लाभदायक ठरेल.