शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

कडूलिंब एक, गुण अनेक

कडूलिंबापासून तयार केलेल्या तेलाने मालिश केल्यास गंभीर असे चर्मरोग नाहीसे होतात. लिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास आरोग्यास लाभदायी ठरते. आजच्या आधुनिक युगातही कडूलिंबाच्या काडीने दात घासले जातात. दात मजबूत व रोगमुक्त करण्यात कडूलिंबाचे फार मोठे योगदान राहिले आहे. विदेशात कडूलिंबावर संशोधन करण्यात येत असून डायबिटीजपासून तर एड्स, कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर जालीम औषधाचा शोध घेतला जात आहे.